उत्तर प्रदेश : बिजनौरमध्ये गंगा नदीत बोट पलटली, १४ जणांना वाचविण्यात यश

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश राज्यातील बिजनौरमधील गंगा नदीत बोट पलटून अपघात झाला आहे. या अपघातामधील १४ जणांना वाचविण्यात आले आहे तर १३ जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. पोलीसांकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, मंडावर पोलीस स्टेशन क्षेत्रातील डैबलगड आणि राजारामपूर गावातील एकूण २७ महिला आणि पुरूष शेतकरी बोटीतून प्रवास करत होते. सर्व प्रवासी शेतकरी गंगा नदीच्या पलीकडे असलेल्या शेतातून रोजच्या प्रमाणे जनावरांना चारा घेऊन परतत होते. मात्र परतत असताना दुपारच्या वेळी गंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोट पलटी झाली.

पोलिसांच्या माहितीनुसार गंगा नदीच्या किनारी असलेल्या लोकांनी ही दुर्घटना कळताच १४ जणांना पाण्यातून वाचवले. मात्र अद्याप १३ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध अद्याप सुरू अाहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)