बिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये

कॉंग्रेसला सन्मानजनक जागा मिळाव्यात : अखिलेशसिंह

लखीसराई: आघाडीच्या बाबत उत्तरप्रदेशात जे झाले ते बिहारमध्ये होऊ नये. बिहार मध्ये राजद हा आघाडीतील मोठा भाऊ आहे असे आम्ही मानतो पण त्याच वेळी आम्हाला या राज्यात सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणी कॉंग्रेस नेते अखिलेशसिंह यांनी केली आहे. भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व म्हणून राहुल गांधी यांचाच चेहरा आपल्याला पुढे करायला लागणार आहे हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखिलेशसिंह हे कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य आहेत. त्यांनी आज येथे बोलताना सांगितले की राजद बरोबर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. या जागा वाटपाबाबत लवकरच तोडगा निघेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. एनडीए विरोधी आघाडीत बिहारमध्ये कॉंग्रेस आणि राजद यांच्या व्यतिरीक्त हिंदुस्थानी अवामी मोर्चा, आरएलएसपी, शरद यादव यांचा लोकतांत्रिक जनता दल आणि डाव्या आघाडीतील पक्षांचा समावेश आहे.

या सर्वांचे एकत्रित महागठबंधन करण्याचा प्रयत्न राजदकडून सुरू आहे. तथापी या महागठबंधनचे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडेच आहे आणि तेच आमच्या आघाडीचा बिहारमधीलही चेहरा असणार आहेत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)