बिहार – भारतीय जनता पक्षाचे चंपारण येथील लोकसभा उमेदवार संजय जयस्वाल यांच्यावर आज बिहार येथील निवडणूक मतदान केंद्र क्रमांक १६२, १६३च्या बाहेर जमावाद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी निवडणूक केंद्राबाहेर हातामध्ये काठ्या घेऊन जमावाने संजय जयस्वाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
याबाबत अधिक माहिती देताना बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एचआर श्रीनिवास म्हणाले की, “एका प्रक्षोभक भाषणानंतर येथील संतप्त जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली असून आता सर्व काही शांतपणे चालले आहे. मी याबाबत सविस्तर रिपोर्ट घेणार असून, आताच्या घडीला माझ्याकडे केवळ जमावातील काही लोकांच्या हातात काठ्या होत्या व खासदारांच्या बॉडीगार्डने हवेत गोळीबार केला असल्याची माहिती उपलब्ध आहे.”
#WATCH: Narkatiaganj: An attempt was made to attack Sanjay Jaiswal (in red kurta), BJP candidate from West Champaran Parliamentary Constituency, with sticks outside polling booth no. 162, 163. He is unhurt. #Bihar #LokSabhaElections2019 pic.twitter.com/sxL3YWyAT7
— ANI (@ANI) May 12, 2019
Bihar Chief Electoral Officer HR Srinivasa: An instigating speech was made after which situation got heated. Police immediately intervened,now everything is going on peacefully. I'll take a report. There were sticks in some people's hands, MP's bodyguard had also fired in the air pic.twitter.com/yy9ZMp7KfK
— ANI (@ANI) May 12, 2019