निरव मोदीला मोठा धक्का! वेस्टमिनिस्टर कोर्टाने जामीन नाकारला 

लंडन : भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी निरव मोदी याच्या संकटांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतीय बँकांचे पैसे बुडवणारा निरव मोदी हा लंडन येथे वास्तव्यास असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. यानंतर लंडन येथील वेस्ट मिनिस्टर कोर्टाने काल निरव मोदीच्या अटकेचे आदेश दिले होते.

कोर्टाच्या या आदेशावर कारवाई करत लंडन पोलिसांनी आज निरव मोदी यास अटक करत कोर्टापुढे सादर केले होते. निरव मोदीच्या वकिलांकडून निरव मोदीला कोर्टाने जामीन द्यावा अशी मागणी केली होती मात्र कोर्टातर्फे ही मागणी फेटाळून लावण्यात आले असून निरव मोदी याला आता 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1108350052660056065

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)