निरव मोदीला पुन्हा मोठा धक्का! वेस्टमिनिस्टर कोर्टाने जामीन नाकारला

लंडन – भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी निरव मोदी याच्या संकटांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतीय बँकांचे पैसे बुडवणारा निरव मोदी हा लंडन येथे वास्तव्यास असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. यानंतर लंडन येथील वेस्ट मिनिस्टर कोर्टाने निरव मोदीच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानंतर आज लंडन येथील वेस्ट मिनिस्टर कोर्टाने निरव मोदीचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला आहे.

निरव मोदीच्या वकिलांकडून निरव मोदीला नजकैदेत, इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या द्वारे लक्ष ठेवण्याच्या अटीवर त्याचा जामीन मंजूर करावा असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. परंतु वेस्ट मिनिस्टर कोर्टाने हा अर्ज नाकारला असून निरव मोदीचा जामीन अर्ज आज पुन्हा फेटाळला आहे. तर पुढील सुनावणी २६ एप्रिल ला होणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1111643191307051009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)