रॉस टेलरच्या नावे मोठा विक्रम

डूनडीन: न्यूझीलंडचा मधल्याफळीतील फलंदाज रॉस टेलरने बांग्लादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 50 धावांची खेळी केली. यात 33 व्या षटकात एकेरी धाव घेत न्यूझीलंडसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्याने माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगचा 280 डावात 8007 धावा करण्याचा विक्रम मोडला.

यासाठी त्याने केवळ 218 सामने खेळले. तर 28 व्या षटकात फाईन लेगला एकेरी धाव घेत न्यूझीलंडसाठी एकदिवसीय सामन्यात 8000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरण्याचा मानही मिळवला आहे. याबाबतीतही त्याने फ्लेमिंगपेक्षा कमी सामने खेळले आहेत. न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेट प्रकारात सर्वाधिक 7172 धावा करण्याचा विक्रम फ्लेमिंगच्या नावे असून तो विक्रम मोडण्यासाठी टेलरला 649 धावा कमी आहेत. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो हा विक्रमही मोडण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)