ग्राहकोपयोगी क्षेत्रातील मोठ्या संधी

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात ग्राहकोपयोगी क्षेत्रातील कंपन्या चांगला मोबदला देतील, यासाठी ज्योतिषाची गरज नाही. अशा कंपन्या हेरण्याचा चांगला मार्ग म्हणजे या कंपन्यांवर आधारित म्युच्युअल फंड. 

संदीप भूशेट्टी 
गुंतवणूक तज्ज्ञ व आर्थिक सल्लागार

135 कोटी भारतीयांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेता भारतात ग्राहकोपयोगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये येणाऱ्या काळात फार मोठ्या नफ्याची शक्‍यता दिसत आहे. त्यामुळे ग्राहकोपयोगी क्षेत्र (कझम्प्शन) अत्यंत आकर्षक झाले आहे.
भारत देश जगात सर्वात वेगाने प्रगती करणारा देश ठरला आहे. 134 कोटी लोकसंख्या असलेली आणि 7.3 टक्के दराने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था जगात वेगाने प्रगती करत आहे. देशात सध्या 65 टक्क्‌यांपेक्षा जास्त तरुण लोकसंख्या आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात विविध गरजांवर पैसा खर्च होताना दिसत आहे. एकूण लोकसंख्येच्या 68 टक्के जनता ग्रामीण भागात व उर्वरित 32 टक्के जनता शहरांमध्ये विविध दैनंदिन गरजांवर पैसे खर्च करत  आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकूण उपभोग क्षेत्रात होणाऱ्या व्यवहारात सगळ्यात जास्त खासगी क्षेत्रात म्हणजे 60 टक्के देशाच्या एकूण उपभोग खर्च होत आहे. या खालोखाल आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांकडे 21 टक्के, सरकारी क्षेत्रातील कंपन्यांकडे 11 टक्के व्यवहार होताना दिसत आहेत व उर्वरित अन्य क्षेत्रात खर्च होताना दिसत आहे.

खासगी क्षेत्रात विविध प्रकारात मोठी वाढ होताना दिसत आहे. खासगी क्षेत्रातील साठ टक्क्‌यांची विभागणी केली तर खाद्य क्षेत्रात 32 टक्के, वाहतूक आणि दळणवळण 17 टक्के, विविध वस्तू आणि सेवा विभागात 15 टक्के, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात 5 टक्के, वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्रात 5 टक्के, फर्निचर व संबंधित उपकरणांच्या क्षेत्रात 3 टक्के, कपडे व पादत्राणांवर सहा टक्के अशा वाढ दिसत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत भविष्यात याहीपेक्षा मोठी वाढ उपभोक्ता क्षेत्रात होऊ शकते.

देशातील सध्याच्या सरकाराच्या महत्वाकांक्षी योजना – जीएसटी, अनुदानाची रक्कम थेट बॅंक खात्यात जमा करणे, जनधन योजना, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, शेतीतील उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट, थेट परकीय गुंतवणुकीला अनेक क्षेत्रात मंजुरी, 100 स्मार्ट सिटीचे उद्दिष्ट, परवडणाऱ्या दरात घरांची योजना, टेलिफोन आणि वाहतूक क्षेत्रात वेगाने वाढ करण्याचे उद्दिष्ट अशा अनेक बाबी उपभोग क्षेत्रात मोठी क्रांती आणणार आहेत.

व्यावसायिकांकडून थेट ग्राहकांकडे (बी टू सी)
वस्तू व सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीतून मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवा योग्य दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणाऱ्या मूल्यवर्धित सेवा, वाहतूक, वित्त, ग्राहकाभिमुख क्षेत्रे, खते, सिमेंट, गॅस, स्थानिक आरोग्य सेवा, जागा, दूरसंचार सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये थेट ग्राहकांपर्यंत सेव वस्तूंची मागणीनुसार थेट पूर्तता होत आहे.

या क्षेत्रावर आधारित काही म्युच्युअल फंड योजनांचा परतावा पुढीलप्रमाणे आहे.
जर पुढील योजनांमध्ये सुरुवातील जर एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असता त्याचे आजचे मूल्य

दि. 17 ऑगस्ट 2018 पासून 31 ऑगस्ट 2018 पर्यंत बीएनपी पारिबास म्युच्युअल फंडाच्या बीएनपी पारिबास इंडिया कन्झ्मप्शन फंडाची रु. 10 दराने नवीन योजना सुरू होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)