औद्योगिक उत्पादनात मोठी घट 

मे महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग आणि ऊर्जा क्षेत्राच्या उत्पादकतेत घसरण 
अपुरा भांडवल पुरवठा आणि व्याजदर वाढीमुळे औद्योगिक उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीतून औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे बाहेर येण्याच्या मार्गावर असतानाच महाग भांडवलाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. भांडवल पुरवठा वाढला नाही तर आगामी काळातही औद्योगिक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 
डी. एस. रावत 
महासंचालक, असोचेम 
नवी दिल्ली: मे महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ 3.2 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. हा 7 महिन्यांचा नीचांक आहे. या महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग आणि ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता बरीच घसरली आहे. एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादन 4.8 टक्‍क्‍यांनी वाढले होते. तर गेल्या वर्षी मे महिन्यात औद्योगिक उत्पादन 2.9 टक्‍क्‍यांनी वाढले होते. यावर्षी एप्रिल ते मे या काळात औद्योगिक उत्पादन 4.4 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी या काळात औद्योगिक उत्पादन 3.1 टक्‍क्‍यांनी वाढले होते. 
मे महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.8 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राची उत्पादकता 2.6 टक्‍क्‍यांनी वाढली होती. ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 5.7 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. मे महिन्यात सर्वांत खराब कामगिरी ग्राहक वस्तू क्षेत्राने केली आहे. या महिन्यात या क्षेत्राचे उत्पादन 2.6 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे जे की गेल्या वर्षी 9.7 टक्‍क्‍यांनी वाढले होते. भांडवली क्षेत्राची उत्पादकता 7.6 टक्‍क्‍यांनी, पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता 4.9 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 
केंद्र सरकारने या वर्षी विकासदर 7.5 टक्‍क्‍यांनी वाढविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आहे. मात्र, औद्योगिक उत्पादन इतक्‍या कमी प्रमाणात वाढल्यास अशा प्रकारचा विकासदर साध्य करणे केवळ अशक्‍य आहे. उद्योग क्षेत्राला अगोदरच भांडवलाचा पुरवठा कमी होत होता. बॅंका अडचणीत असल्यामुळे आणखी भांडवलाचा पुरवठा कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगामी काळात भांडवल पुरवठ्याच्या अभावामुळे औद्योगिक उत्पादन आणखी कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात 
येत आहे. सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेवर फारसा परिणाम होण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र, या क्षेत्रातून तुलनेने कमी रोजगार निर्मिती होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यावर आगामी काळात भर देण्याची गरज असल्याचे उद्योजकांच्या संघटनांनी सांगितले आहे. या वर्षी कृषी क्षेत्राची उत्पादकता मात्र वाढण्याची शक्‍यता दिसून येत आहे. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)