बिग बजेट सिनेमांची होणार टक्‍कर

पुढच्या वर्षी बॉक्‍स ऑफिसवर “बिग बजेट’ सिनेमांची रेलचेल होणार आहे. “समशेरा’, “सूर्यवंशी’, “इंशाअल्लाह’ आणि “आरआरआर’ सारख्या बड्या सिनेमांची एक टक्‍कर बघायला मिळणार आहे. याशिवाय काही बायोपिक आणि वॉर मुव्हीजही जानेवारी महिन्यात धडकणार आहेत. त्यात “तानाजी : अ अनसंग हिरो’ आणि “छपाक’चाही समावेश असणार आहे. तानाजी मालुसरेचा युद्धपट आणि ऍसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावरील सिनेमांमुळे वास्तवाचे दर्शन पडद्यावर बघायला मिळणार आहे. जुलै महिन्यात रिलीज होणाऱ्या “आरआरआर’मध्येही अल्लूरी सीताराम राजू आणि कोमारराम भीम या दोन स्वातंत्र्यसैनिकांची कथा मांडलेली असणार आहे.

“इंशाअल्लाह’ आणि “सूर्यवंशी’ ईदच्या सुमारास रिलीज होणार आहेत. अक्षय कुमारचा लीड रोल असलेला “सूर्यवंशी’ या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. मात्र नंतर निर्मात्यांनी रिलीज 22 मे 2020 रोजी करण्याचे निश्‍चित केले आहे. सलमान आणि आलियाचा “इंशाअल्लाह’पण याच सुमारास रिलीज होणार आहे. संजय लिला भन्साळींच्या या सिनेमाच्या बरोबर अजय देवगण आणि रणबीर कपूरचा आणखी एक सिनेमाही रिलीज होणार आहे. या सिनेमाचे शिर्षक अद्याप निश्‍चित झालेले नाही. याशिवाय “क्रिश’ सिरीजमधील चौथा सिनेमा “क्रिश- 4’देखील याच कालावधीमध्ये रिलीज होण्याची शक्‍यता आहे. हे सिनेमे ख्रिसमसच्या सुमारास रिलीज होतील.

एकूणच 2020 मध्ये एकूण 8 बिग बजेट सिनेमे रिलीज होणार असे आता तरी निश्‍चित झाले आहे. वर्षभर बॉक्‍स ऑफिसवर एकाच्या विरोधात दुसरा सिनेमा अशी रेस सुरू राहणार आहे. यामध्ये एका सिनेमाला फायदा व्हावा आणि आपल्या सिनेमाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रमोशनवर निर्मात्यांची अधिक भिस्त असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)