बिग बाॅस 12 : प्रीमिअरमध्ये सलमान सोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

नवी दिल्ली – बिग बाॅसचे 12 वे पर्व सुरू होण्यास तीन दिवस उरले आहेत. रविवारी रात्री सलमान एक वर्षानंतर परत एकदा बिग बाॅस होस्ट करताना दिसणार आहे. यावेळची  बिग बाॅस कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा लोणावळ्याएेवजी गोवामध्ये होणार आहे. बिग बाॅसला घेऊन मागील काही दिवसामध्ये होणार खुलासे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवत आहेत.

दरम्यान अशी बातमी येत आहे की, यंदाच्या बिग बाॅसच्या उद्घाटन सोहळ्यात मागील बिग बाॅस कार्यक्रमाची विजेती  शिल्पा शिंदे सलमान सोबत बिग बाॅस होस्त करताना दिसणार आहे. मागील पर्वामध्ये अनेकवेळा शिल्पा शिंदे सलमानसोबत दिसली होती. यावेळी सलमान सोबत शिल्पा शिंदे काय धमाल करणार आहे ?, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

‘भाभी जी घर पे हैं’ या मालिकेतील साकारलेल्या ‘अंगूरी भाभी’ या भूमिकेमुळे शिल्पा शिंदे हिने तिची वेगळी अोळख बनविली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)