बिग बाॅस 12 : श्रीसंत बनला खलनायक

लोणावळा – बिग बाॅस 12 मध्ये श्रीसंतचा ड्रामा पहिल्या दिवसापासूनच बघायला मिळत आहे. लहान सहान मुद्द्यांवर रडत बसने आणि टास्क अर्धवट करण्याच्या सवयीमुळे सलमानने मागील आठवड्यामध्ये श्रीसंतला चांगलेच फटकारले होते. इतकेच नाही तर सलमान खानने श्रीसंतच्या खिलाडू वृत्तीवर देखील प्रश्नचिन्ह उठवले होते.

दरम्यान बिग बॉस वीकेंड वारमध्ये पुन्हा एकदा सलमानने श्रीसंतला त्याच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे फटकारले आहे. श्रीसंतने मागील काही दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांसोबत बेशिस्त वर्तणूक केली होती तसेच सदस्यांना  खलनायक खुर्चीसाठी सदस्याची निवड करण्याबाबत मत  विचारले असता दीपकचे नाव घेतात मात्र सलमान श्रीसंतला खलनायकाच्या खुर्चीवर बसवून प्रश्न विचारले असता त्याला योग्य उत्तर देता आले नाही. सलमाने त्यांची समजूत घातली, यावेळी श्रीसंत इमोशनल होऊन पुन्हा रडू लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)