बिग बी विसरले स्वतःचाच चेहरा

बिग बी अमिताभ बच्चन यांना अलीकडच्या “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्ये लांब दाढीमध्ये बघितले गेले होते. “चेहरे’ आणि “गुलाबो सिताबो’ मध्येही त्यांचा लुक लांब दाढीतलाच होता. या सिनेमांमधील हा गेटअप खूपच आवडला होता. इतका की अमिताभ स्वतःचा खरा चेहराच विसरून गेले. स्वतः अमिताभ यांनीच आपल्या ब्लॉगमध्ये ही बाब कबूल केली आहे.

दाढी असलेला लुक एकापाठोपाठ एक तीन सिनेमांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मला माझा ओरिजनल चेहराच आता आठवेनासा झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांचा कॉमिक सेन्स जबरदस्त आहे. काही दिवसांपूर्वी कतरिना कैफने आपल्या उंचीमुळे आपल्याबरोबर आमीर, शाहरुख आणि सलमान हे हिरो शोभून दिसत नसल्याची खंत व्यक्‍त केली होती. त्यावरही अमिताभ यांनी आपली उंची 6 फूट असल्याचे ट्‌विट करून आपल्यालायक रोल असल्यास सांगण्याची विनंती कॅटला केली होती.

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक काळ बिझी असलेल्या अमिताभना जर रिकामा वेळ मिळलाच तर ते आपल्या जुन्या काळतल्या आठवणींचे अल्बम काढून बसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्‌विटरवर राजेश खन्ना, शम्मी कपूर आणि शशी कपूर य दिवंगत सहकाऱ्यांचे काही फोटो शेअर केले होते. या सहकाऱ्यांच्याबरोबर आपण एकेकाळी नॉन स्टॉप शेड्युलमध्ये काम करत होतो. त्या फोटोंकडे बघितल्यावर मात्र आपण आता काय करतो आहोत, हेच समजत नाही. त्यामुळे रिकाम्या वेळी मी काहीही करत नाही. केवळ जुन्या आठवणी ताज्या करत बसून राहतो, असेही त्यांनी म्हटले होते. अमिताभ सध्या आयुष्मान खुरानाबरोबर “गुलाबो सिताबो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)