मोठी कारवाई : नागपूरमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी

नागपूर  – आयकर विभागाकडून आज नागपुर येथील मस्कासाथ परिसरात छापे मारत मोठी कारवाई करण्यात आली आहे. तिथे अनेक खासगी लॉकर्स असल्याचे या कारवाईनंतर उघडकीस आले आहे, अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या पिंपरेवाडा टोल नाक्‍याजवळ तेलंगणा पोलिसांनी 19 ऑक्‍टोबर रोजी 10 कोटी रुपयांची रक्‍कम जप्त केली होती. सदर रक्कम नागपूरच्या मस्कासाथ परिसरातून आणली असल्याची माहिती कारचालकाने पोलीस तपासात दिली होती. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयकर अधिकाऱ्यांनी मस्कासाथ परिसरात एका इमारतीवर दोन दिवसांपासून लक्ष केंद्रीत करत चौकशी सुरु केली होती. अत्यंत गुप्तरित्या सुरु असलेल्या या चौकशीमध्ये आयकर अधिकाऱ्यांना मस्कासाथ परिसरातल्या त्या इमारतीत एक नव्हे तर अनेक लॉकर्स सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे या इमरतीतून अनेक व्यापाऱ्यांसाठी खासगी लॉकर सेवा तर पुरविली जात नव्हती ना, याची चौकशी आयकर विभाग करत आहे. तसेच या खासगी लॉकर्समध्ये कोणकोणत्या व्यापाऱ्यांचे, नेत्यांचे घबाड लपवले आहे का याची चौकशीही आयकर अधिकारी करत आहेत. या इमारतीशिवाय नागपुरातील कळमना, सतरंजीपुरा आणि रामदासपेठ परिसरात ही प्रत्येकी एका ठिकाणी चौकशीचे काम सुरु असल्याचे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)