सायकल स्पर्धेत संदेश उप्पर विजेता

पुणे – मध्य रेल्वेच्या संदेश उप्पर याने राष्ट्रीय स्तरावरील पुणे ते बारामती (120 किलोमीटर) सायकल स्पर्धेमधील पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला हे अंतर पार करण्यास 2 तास 54 मिनिटे 1 सेकंद वेळ लागला. घाटाचा राजा हा किताबही त्याने मिळविला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

चुरशीने झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत संदेशचा सहकारी श्रीधर सौनूर याने द्वितीय क्रमांक मिळविला त्याने हे अंतर 2 तास 54 मिनिटे 01 सेकंद या वेळेत पार केले. कर्नाटकच्या यलगुरव यलकुट्टीने ही स्पर्धा 2 तास 54 मिनिटे 2 सेकंदात पूर्ण करीत तृतीय क्रमांक घेतला. दरम्यान, पुरूष गटातील राज्यस्तरीय पुणे ते बारामती (120 कि. मी.) स्पर्धेमध्ये सांगलीचा दिलीप माने याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला हे अंतर पार करण्यासाठी 2 तास 54 मिनिटे 07 सेकंद वेळ लागला. पुण्याच्या हनुमान याचोपडे (2 तास 54 मिनिटे 56 सेकंद) याने दुसरे स्थान घेतले.

तर मुंबईचा विनीत सावंत (2 तास 54 मिनिटे 57 सेकंद) याने तिसरे स्थान घेतले. घाटाचा राजा हा किताबही सांगलीचा दिलीप माने यालाच मिळाला. राज्यस्तरीय सासवड ते बारामती एमटीबी सायकल खुल्या (85 किमी) स्पर्धेमध्ये नाशिकच्या भारत सोनवणे (2 तास 35 मिनिटे 15 सेकंद) याला प्रथम क्रमांक मिळाला. सांगलीच्या सागर अमदे (2 तास 35 मिनिटे 42 सेकंद) याने द्वितीय क्रमांक मिळविला तर अहमदनगरच्या विकास रोठे याने (2 तास 41 मिनिटे 57 सेकंद) तिसरे स्थान घेतले.

जिल्हा स्तरावरील 14 ते 16 वर्षे वयोगट) (15 किमी) स्पर्धेमध्ये बारामतीची राधिका गराडे( 36 मिनिटे 23 सेकंद), पिंपरी चिंचवडच्या सिद्धी शिर्के (26 मिनिटे 52 सेकंद) व प्रगती भगत (30 मिनिटे 44 सेकंद)यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाने. मुलांच्या 14 ते 16 वर्षे गटात (15 किमी) पुण्याच्या पारस नातू (23 मिनिटे 01 सेकंद) व पार्थक देशमुख (23 मिनिटे 05 सेकंद) यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक घेतले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)