भूमी पेडणेकर- कोंकणा सेन एकत्रित झळकणार 

मुंबई – छोट्या पडद्याची राणी म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर लवकरच एक चित्रपट तयार करणार आहे. हा चित्रपट महिलाकेंद्रित विषयावर आधारित आहे. दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांच्यासोबत एकता तयार करणार आहे.

बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींची एकताच्या या महिला केंद्रित चित्रपटात वर्णी लागली आहे.

या चित्रपटात “लिप्स्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी कोंकणा सेन शर्मा आणि “टॉयलेट’ चित्रपटात दमदार भूमिका साकारणारी भूमी पेडणेकर या दोघी झळकणार आहेत. पुढच्या आठवड्यात या चित्रपटाचे शुटिंग सुरु होणार आहे. दरम्यान, अलंकृता श्रीवास्तव यांनी या चित्रपटासाठी सर्वप्रथम विद्या बालनला पसंती दिली होती. मात्र, काही कारणास्तव विद्या बालनने हा चित्रपट साईन न केल्याने कोंकणाला संधी देण्यात आली.

कोंकणाचा “लिप्स्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट अनेक वादात सापडला होता. या चित्रपटावर “असंस्कारी’ असल्याचा ठपका लागला होता. हा चित्रपट जास्तच महिलाकेंद्रित असल्याचे कारण देत सेन्सॉर बोर्डने हा चित्रपट नाकारला होता. आता एकताच्या चित्रपटात महिलाकेंद्रित आशयावर कोंकणाची भूमिका पाहायला मिळणार आहे.

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)