भुईंज पोलीसांना कायद्यापेक्षा आयजी मोठा ?

सातारा: भुईंज परिसरात महामार्गावर एका पादचाऱ्याला ठोकरुन जाणाऱ्या गाडीचा मात्र पोलीस ठाण्यात भलताच थाट झाल्याची चर्चा आहे.

पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या कारमध्ये विशेष पोलीस महानिरिक्षकाचा दर्जा असलेले अधिकारी असल्याचे कळताच भुईंज पोलीसांनी त्यांना पायघड्या घालुन काही घडलेच नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. अपघात झाल्यानंतर पळुन जाणार्‍या कारला ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले होते. परंतु गाडीत वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे समजल्यावर त्यांना गाडीसहीत सोडून देण्याचा प्रताप भुईंज पोलीसांनी केला आहे. त्यामुळे कायद्यापेक्षा कोणीच मोठा नसल्याचे सांगणार्‍या पोलीसांना मात्र कायद्यापेक्षा आयजी मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातात जखमी पादचाऱ्याचा मात्र मृत्यू झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याच्या हद्दीत डीमार्टसमोर काळ्या रंगाची इनोव्हा कारने (MH 09 EE 0108) एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. गाडीच्या धडकेने पादचारी दत्तात्रय शेवते (पूर्ण नाव पत्ता नाही) हे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संबंधित कार तिथे न थांबता निघून गेली. स्थानिकांनी हा अपघात पाहिल्यानंतर गाडीचा पाठलाग केला. स्थानिकांनी ही कार आनेवाडी टोल नाक्याजवळ अडवली.

टोलनाक्याजवळ पकडलेली कार आणि चालकाला स्थानिकांनी भुईंज पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडीत विशेष पोलीस महानिरिक्षक असल्याचे लक्षात आल्यावर सामान्य लोकांना कायद्याचा धाक दाखवणार्‍या भुईंज पोलीसांनी अपघातग्रस्त कारला सोडून देण्याचा प्रताप केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)