हिंसाचाराला ‘एल्गार परिषद’ हा ठोस पुरावा नाही

संग्रहित छायाचित्र

मावळते सह पोलीस आयुक्‍त रवींद्र कदम : उघकीस आलेले पत्र हे माओवाद्यांचे

लॅपटॉपमधून सापडलेल्या 200-250 पत्रांचा तपास सुरू

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पोलिसांना अटक केलेला माओवाद्यांकडून आतापर्यंत 200 ते 250 पत्र सापडले आहेत. सापडलेल्या पत्रांचा तपास सुरू आहे. दुर्दैवाने तीन पत्रे लिक झाली आहेत. त्या लिक झालेल्या पत्रामुळे तपासावर परिणाम झाला आहे. हे तिन्हीही पत्र खरेच आहेत. पोलिसांनी तयार केलेली नाहीत, असे पुण्याचे मावळते पोलीस सह आयुक्त रवींद्र कदम यांनी स्पष्ट करत, एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव येथे हिंसा घडल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप पोलिसांना मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने “शहरी माओवादी चळवळ’ या विषयावर कदम यांच्याशी वार्तालाप आयोजित केलेला होता. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर यावेळी उपस्थित होते. कदम म्हणाले, नक्षलवादी आणि माओवादी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जंगलातील आदिवासींना माओवाद, लेलीन समजून सांगणे अवघड आहे. या चळवळीला बुद्धीवादी लोकांची गरज असल्याने शहरांमधील कामगार आणि विद्यार्थी वर्गाला नक्षली चळवळींकडून लक्ष केले जात आहे. या बुद्धीवंतांना विविध साहित्य वाचायला देऊन त्यानंतर सीपीआय (एम) संघटनेचे सदस्यत्व दिले जाते. क्रांती घडविण्याच्या नादात आपण नेमके काय करत आहोत, हेच त्यांना कळत नाही. शहरी भागात माओवादी तयार करण्यासाठी प्रैंटल ऑर्गनायझेशनद्वारे जाळे विणले जात आहे. राज्यात पुण्यासह मुंबई, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, लातूर अशा शहरांमध्येही शहरी नक्षलवाद वाढत आहे. त्यावर नियंत्रण येणे आवश्‍यक आहे.

एल्गारच्या आयोजनात माओवादी अॅॅड. सुरेंद्र गललिंग, सोम सेन यांच्याकडून सुधीर ढवळेला भरपूर पैसा मिळाल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून 200 ते 250 पत्र सापडले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने आता संकेतिक भाषांमध्ये हे पत्र लिहिले गेलेले नाहीत. त्यामुळे हे पत्र बनावट असल्याचा गैरसमज योग्य नाही. एका पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा उल्लेख आहे. या पत्रव्यवहारात सध्याचे केंद्र सरकार ज्या पद्धत्तीने काम करत आहे, त्यामुळे माओवादी चळवळीचे अस्तित्व धोक्‍यात येईल असे उल्लेख वारंवार आले आहेत. त्यामुळे सरकारविरोधात वातावरण तयार करण्यासाठी शहरी मुद्दे उपस्थित करून त्यांच्या माध्यमातून सरकारला टार्गेट केले जात आहे. रोहित वेमुला प्रकरण, अफझल गुरू फाशी, दलित अत्याचार प्रकरणांबद्दल चुकीच्या पद्धत्तीने प्रचार करून क्रांती घडविण्यासाठी हिंसा अपरिहार्य आहे असे सांगितले जात आहे.

एल्गार परिषदेच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यातील सर्वांचाच माओवाद्यांशी संबंध होता असे नाही. अनेकांना यामध्ये माओवादी आहेत याची माहिती देखील नसेल. तसेच एल्गार परिषद घेण्यात काहीच गैर नव्हते. त्यामुळे त्यास पोलिसांकडून विरोध करण्याचे काहीही गजर नव्हती. परंतु, ही परिषद झाल्यानंतर यामधील माओवाद्यांचा संबंध पुढे आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)