कोरेगाव भीमा हिंसा प्रकरण : हरियाणातील नॅशनल लाॅ काॅलेजच्या महिला प्राध्यापिकेला अटक

संग्रहित छायाचित्र

हरियाणा – कोरेगाव भीमा दंगलीच नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिंसानी आज मुंबई, ठाणे मध्ये ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच दिल्ली, हैदराबाद, रांची आणि हरियाणा या शहरांमध्ये देखील हे छापासत्र सुरू आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी आज हरियाणात देखील छापा टाकला आहे. मानवधिकार कार्यकर्ता आणि नॅशनल लाॅ काॅलेजच्या प्राध्यपिका डाॅ. सुधा भारद्वाज यांना मंगळवारी सकाळी सात वाजता फरिदाबाद येथील चार्मवूड विलेज सोसायटीमधून महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी डाॅ. सुधा यांच्या घरातून दोन लॅपटाॅप, दोन मोबाइल, एक पेन ड्राइव्ह जप्त केले आहे. याशिवाय डाॅ. सुधा यांच्या ट्विटर, फेसबुक आणि ईमेल अकाउंटचे पासवर्ड सुध्दा घेतले आहेत. आज सांयकाळी ४ वाजता डाॅ. सुधा यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी दिवाणी न्यायधिश साक्षी सैनी यांनी न्यायालयात दोन्हीकडील बाजू एेकून घेत निर्णय सुरक्षित ठेवला आहे. पोलिस आणि  डाॅ. सुधा हे न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)