भीम आर्मीच्या प्रमुखांची मोदींविरोधात लढण्याची घोषणा

नवी दिल्ली – भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली. मोदी लोकसभेत उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
मी वाराणसीतून मोदींना आव्हान देणार आहे. मोदी त्या मतदारसंघातून पुन्हा लोकसभेवर निवडून जाणार नाहीत याची निश्‍चिती मी करणार आहे. राज्यघटना आणि दलितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मी ते पाऊल उचलणार आहे. खासदार किंवा आमदार बनणे हे माझे उद्दिष्ट नाही.

खासदार किंवा आमदार बनण्याची इच्छा असती; तर मी राखीव मतदारसंघांची निवड केली असती, अशी भूमिका चंद्रशेखर यांनी मांडली. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधातही उमेदवार देणार असल्याचे भीम आर्मीने जाहीर केले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी सप-बसप आघाडीची स्थिती मजबूत नसेल तिथे उमेदवार रिंगणात उतरवण्याची भूमिका भीम आर्मीने घेतली आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नुकतीच चंद्रशेखर यांची भेट घेतली. त्यापार्श्‍वभूमीवर, चंद्रशेखर आणि भीम आर्मीने जाहीर केलेल्या भूमिकेचे महत्व वाढले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)