मुंबई: मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या नामांतर करण्यासाठी भीम आर्मी संघटनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. दादर रेल्वे स्टेशनचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते थेट दादर स्टेशनमध्ये शिरत त्यांनी जागोजागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस लिहिलेले स्टिकर्स चिकटवले.
पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर, प्रभादेवी या स्टेशनची नावे बदलण्यात आली. मग दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का दिले जात नाही, असा प्रश्न भीम आर्मीने उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली आहे.
मात्र दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलू नये, अशी भूमिका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. नामांतराच्या मागणीऐवजी लोकांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावेत. दादर स्टेशनसह अनेक वास्तू या मुंबईच्या अस्मितेच्या प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांची नावे बदलण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा