भय्यू महाराजांचा सेवेकरी विनायक दुधाळे याला अटक

भोपाळ: आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्याप्रकरणी बेपत्ता असलेला त्यांचा सेवेकरी विनायक दुधाळे याला अटक करण्यात आली आहे. इंदूर पोलिसांनी शुक्रवारी विनायकला ताब्यात घेतले. इंदूरच्या आझादनगर पोलीस ठाण्यात विनायक दुधाळे आणि इतर आठ ते दहा जणांची कसून चौकशी केली जात आहे. विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांच्या विश्‍वासातला सेवेकरी होता. मात्र, जून महिन्यात भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर तो गायब झाला होता.

भय्यू महाराजांचे वकील राजा बडजात्यांकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि धमकावणाऱ्या कैलास पाटील याने विनायक दुधाळे हा शरद देशमुख, शेखर पंडित आणि पलक नावाच्या महिलेच्या सहाय्याने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तेव्हापासून इंदूर पोलीस विनायकचा शोध घेत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती. भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांमुळे भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.

दरम्यान, भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घरगुती वादातून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर “माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा’, असा उल्लेख आहे. भय्यू महाराजांचा कुटुंबकबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्‍न त्यावेळी अनेकांना पडला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)