भोजपूरी अभिनेता रवी किशनची दीड कोटीची फसवणूक

भोजपूरी अभिनेता रवी किशन याला मुंबईतील जुहू परिसरात फ्लॅट देतो असे सांगत तीन दलालांनी दीड कोटी रुपयात फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत रवी किशन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

मुंबईत अनेक दिग्ग्ज अभिनेत्यांसह अभिनेत्रीची घरे जुहू परिसरात आहेत. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अनेक कलाकारांप्रमाणे रवी किशन याला जुहू परिसरात फ्लॅट पाहिजे होता. जुहू हाय राईझ सोसायटीत फ्लॅट मिळविण्यासाठी काही दलालांसोबत व्यवहार केला होता. पैसे घेऊनही फ्लॅट देत नसल्याने रवी किशन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे.

-Ads-

कमला लॅण्ड मार्क ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित रिअर इस्टेट कंपन्यांनी याअगोदर वर्सोवातील एक व्यावसायिक सुनील नायर यांची देखील साडे सहा कोटींची फसवणूक केली आहे. पोलिसांनी नायर व रवी किशनची तक्रार एकत्र करून तिघा एजंटांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नायर प्रकरणी पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)