भवानी देवीची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी

चेन्नई – भारताची अव्वल महिला तलवारबाज खेळाडू सी.ए. भवानी देवीने ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या सिनियर कॉमनवेल्थ तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिने इंग्लंडच्या एमिली रॉक्‍सचा 15-12 असा पराभव करत अजिंक्‍यपद स्पर्धा जिंकली तर उपांत्यफेरीच्या सामन्यात तिनेस्कॉटलंडच्या काट्रीओना थॉम्प्सन चा पराभव केला होता.

मूळची चेन्नई असलेल्या भवानी देवीसाठी यंदाचे वर्ष हे खूप चांगले गेल आहे. तिने आईसलंड येथे झालेल्या टूरनोई सैटेलाइट फेन्सिंग चॅंपियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत दुसरा क्रमांक पटकाविला होता. त्याचबरोबर मागील वर्षी झालेल्या तलवारबाजी विश्‍वचषकात तिने सुवर्णपदक जिंकण्याचा कारनामा केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)