‘बबन’ व ‘ख्वाडा’नंतर भाऊराव कऱ्हाडे यांची नव्या चित्रपटाची घोषणा

‘बबन’ आणि ‘ख्वाडा’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्राक्षा फिल्मस् आणि द फोल्क कन्फ्युएन्स एंटरटेंटमेंट प्रस्तुत ‘हैद्राबाद कस्टडी’ हा सिनेमा घेऊन भाऊराव कऱ्हाडे लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर आज भाऊराव कऱ्हाडे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले.

हैद्राबाद कस्टडीच्या पोस्टरवरून हाही चित्रपट वास्तवदर्शी असणार यात शंका नाही. या पोस्टरमध्ये पोलीस चौकशीसारखी रूम दिसत असून टेबल, खुर्ची व त्यावर एक पट्टा ठेवलेला दिसत आहेत. या पट्ट्यावर ‘मेरी आवाज सुनो’ असे वाक्यही लिहण्यात आले आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. परंतु अद्याप या चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, ख्वाडा चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर बबन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. परंतु बबन हा चित्रपट फारसा काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकला नाही. आता यानंतर भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)