दिल्लीत निवृत्त लष्करी अभियंत्याचा भाजून मृत्यू 

नवी दिल्ली – दिल्लीच्या जनकपुरी भागात एका निवृत्त लष्करी अभियंत्याचा त्याच्या घराला लागेल्या आगीत मृत्यू झाल्याची आल्याची घटना घडली आहे. जोगिंदर पाल सिंग असे या अभियंत्याचे नाव आहे ते 62 वर्षीय आहेत. मिलीटरी इंजिनिअररिंग सर्व्हीसेस मध्ये त्यांनी सेवा केली असून तेथून ते 2014 ला निवृत्त झाले आहेत. काल गुरूवारी त्यांच्या घरात आग लागल्याची माहिती मिळाली. तेथे ते एकटेच राहतात.

त्यांची कन्या रोज त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपुस करायची त्यावेळी सायंकाळी हा प्रकार दिसला. हा प्रकार घातपाताचा आहे की अपघाताच याची चौकशी सध्या सुरू आहे. आगीचे नेमके कारणही अजून समजू शकलेले नाही. क्राईम ब्रॅंचच्या पथकाने या प्रकाराची चौकशी हाती घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)