#भाष्य : …रहेंगे यही अपने निशाँ (भाग २)

#भाष्य : ..रहेंगे यही अपने निशाँ (भाग १)

-अंजली महाजन

राज कपूर यांच्या आठवणी जिथं साठवल्या आहेत, तो आरके स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतला आहे. कुटुंबीयांच्या दृष्टीने तो पांढरा हत्ती ठरला असून, आठवणी कायम ठेवून त्यांना तो विकावाच लागेल, असे कुटुंबीयांकडून सांगितले जाते. परंतु आरके स्टुडिओची विक्री व्हावी का? तिथं एखादा मॉल उभा राहावा का? की सरकारनं, मुंबई महापालिकेनं, बड्या औद्योगिक घराण्यांनी पुढे येऊन तिथं राज कपूर यांच्या स्मृती जपणारं संग्रहालय उभारावं?

चित्रपटसृष्टीची ओळख बनलेल्या आरके स्टुडिओचा जीर्णोद्धार करून तिथे चित्रपटसृष्टीचे संग्रहालयही तयार करणे शक्‍य आहे. टाटा, अंबानी यांसारख्या बड्या उद्योजक घराण्यांनी मुंबईला केवळ आधुनिक रूप दिले असे नाही तर मुंबईचा वारसा जपण्याचाही नेहमी प्रयत्न केला आहे.

अशा घराण्यांनीही मुंबईचे हे वैभव जपण्यासाठी स्वतःहोऊन पुढे यायला हवे. आजकाल चित्रपटांचे बहुतांश चित्रीकरण आउटडोअर म्हणजे स्टुडिओबाहेर केले जाते. परंतु त्यामुळे इतिहासाची पाने फाडून फेकून देता येणार नाहीत. स्टुडिओमध्ये चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर होत होते, तेव्हा चित्रपटसृष्टीचे स्वरूप कसे होते, हे दर्शविणारे संग्रहालय उभारण्यासाठी आरके स्टुडिओ हे उत्तम ठिकाण ठरू शकेल. “शो मस्ट गो ऑन’ हे चित्रपटसृष्टीचे ब्रीदवाक्‍य आहे.

त्यामुळेच आरके स्टुडिओमध्ये चित्रीकरण आणि नाटकांचे प्रयोग सुरूच राहायला हवेत. राज कपूर यांचे स्वप्न जपण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. राज कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या एका गाण्याचे बोल होते, “कल खेल में, हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा… भूलेंगे हम, भूलोगे तुम, पर हम तुम्हारे रहेंगे सदा… रहेंगे यही अपने निशॉं… इसके सिवा जाना कहॉं.’ आरके स्टुडिओकडे पाहून याच ओळी आठवतात. राज कपूर यांच्या आठवणी याच स्टुडिओच्या परिसरात आहेत. त्या जपायलाच हव्यात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)