“खतरा खतरा खतरा’मधील भारती सिंहचा वाढदिवस सिरीयलच्या सेटवरच साजर करण्यात आला. तिचा नवरा हर्ष लिंबचियाने तिच्यासठी सेटवरच ही वाढदिवसाची सरप्राईज पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमुळे भारती सिंहचा वाढदिवस अगदी स्पेशल ठरला. पुनीत पाठक, राघव जुवल आणि धर्मेश येलंदे हे देखील या पार्टीमध्ये सहभागी झाले होते.
आपल्य मित्रांबरोबर डान्स करत भारतीने ही पार्टी भरपूर एन्जॉय केली. भारतीला सरप्राईज द्यायला आणि तिला खूष ठेवायला आपल्या खूप आवडते, असे हर्षने सांगितले. गेल्या वर्षी तिचे नाव हर्षने आपल्या छातीवरच टॅटू करून घेतले होते. तिचा वाढदिवस शुटिंगमध्ये आला म्हणून मी तिच्यासाठी सेटवरच पार्टी ठेवली, असेही तो म्हणाला.