भोजपुरी सुपरस्टार ‘रवी किशन’ भाजपकडून निवडणूकीच्या रिंगणात

नवी दिल्ली – लोकसभा 2019 निवडणुकीसाठी भाजपने उत्तरप्रदेशातील उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. भाजपची ही 21 वी यादी आहे. यामध्ये सात उमेदवारांची नावे आहेत.

भाजपने गोरखपूर येथून भोजपुरी सुपरस्टार रविकिशन यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर प्रतापगढ मतदारसंघातून संगम लाल गुप्ता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आंबेडकर नगर येथून मुकुट बिहारी, संत कबीर नगर येथून प्रवीण निशात, देवरियामधून रमापति राम त्रिपाठी, जौनपुर येथून केपी सिंह आणि भदौही मतदारसंघातून रमेश बिंद यांना तिकिट देण्यात आले आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1117729382259236864

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)