#BHARAT : सलमानचा ”न्यू लूक” व्हायरल

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सलमान खानचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपटचा टीझर रिलीज केला होता. या चित्रपटाच्या घोषणेपासून सलमान खानचे चाहते या सिनेमाची वाट पाहत आहे. तसेच चित्रपटाबाबत सध्या सोशल माध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये सलमानचा लुक काही दिवसांपूर्वी अॅश्ले रिबेलो या सलमानचा स्टाईलिस्टने शेअर केला होता. आता पुन्हा सलमानचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सलमानचा ७० च्या दशकातील लूक पाहायला मिळत आहे. हा लुक भारत चित्रपटांसाठी केला गेला आहे अशा चर्चा सुरू आहे.‘भारत’ या चित्रपटात सलमान खान मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासह कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)