भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला विकासाची दिशा दिली- मुख्यमंत्री

मुंबई: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला विकासाची दिशा दिली. भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यॅत शिक्षण पोहोचावे हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या जयंतीदिनी राज्यात महाराष्ट्र शिक्षण मंडळाअंतर्गत  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ होत आहे. ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील 13 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्ण, आयुक्त विशाल सोळंखे, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे संचालक सुनिल मगर, शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, शिक्षणतज्ञ सोनम वांचुक, सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. सदस्य स्वरूप संपत, प्राची साठे, फ्रान्सीस जोसेफ यांना अभ्यासक्रम निर्मितीतल्या सहभागाबद्दल गौरविण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अटलजींनी विविध क्षेत्रात सर्व पद्धतीने विकास करून खऱ्या अर्थाने देशाचा विकास दर वाढविला आहे. त्यांच्या जयंतीनिदिनी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ ही गौरवास्पद बाब आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये आमुलाग्र परिवर्तन घडवून राज्य शिक्षण क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आणत प्रगती साधली आहे. महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण  मंडळाअंतर्गत सुरू झालेल्या शाळेचा अभ्यासक्रम संशोधन पद्धतीचा आहे. ज्यांनी देशातील विकासात आमुलाग्र बदल घडविण्यात सहभाग दिला अशा तज्ज्ञांच्या सहाय्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. व्यक्तीची क्षमता समजून प्रत्येक क्षमतेला वाव देणारी शिक्षण पद्धती तयार करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. तसेच जागतिक स्तराचे ज्ञान असलेला विद्यार्थी तयार व्हावा यासाठीचे प्रशिक्षण, त्यासाठीची क्षमता निर्मिती करण्यासंदर्भातले धोरण मंडळाने तयार केले आहे. देशाला उत्तम योगदान देणारे विद्यार्थी या शाळेतून घडविण्यात येणार असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

शिक्षण विभागाच्या शैक्षणिक बदलांबाबत गौरवोद्गार काढताना मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये क्षमता प्रचंड असून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे होते. शिक्षण विभागाने परिवर्तन घडवून आणल्यामुळे आज विद्यार्थ्यांची शिक्षण क्षमता 100 टक्के झाली आहे. लाखो शिक्षक तंत्रस्नेही असून त्यांनी 8 हजार ॲप तयार करून शिक्षणात आमुलाग्र योगदान दिले आहे. यामुळे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत होत आहेत. हा शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)