नवी दिल्ली – वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या भारत फोर्ज कंपनीने सांगितले की कंपनीचा एक भाग असलेल्या कल्याणी राफेल ऍडव्हान्स सिस्टम या उपकंपनीला इस्रायलच्या राफेल ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टमकडून शंभर दशलक्ष डॉलरचे म्हणजे 664 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.
भारतीय हवाई दल आणि लष्करासाठी क्षेपणास्त्राचे काही भाग बनविण्याचे हे कंत्राट आहे.त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल असे भारत फोर्ज कंपनीने शेअरबाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यामुळे तीनशे रोजगार निर्माण होतील.