मुंबई – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात सुरु असलेल्या भारत बंद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे उतरली आहे. प्रभादेवी येथे निदर्शनं करताना पोलिसांनी पक्षाचे नेते नितीन सरदेसाई ह्यांना अटक केली आहे.

महाराष्ट्रात मुंबई, प्रभादेवी, बोरिवली, डोंबिवली, भांडूप,  पिंपरी-चिंचवड, पुणे या शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंधनदरवाढीविरोधात सुरु असलेल्या भारत बंद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे उतरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)