सनी देओलच्या “भैय्याजी सुपरहिट’पुन्हा पुढे ढकलला 

गेल्या वर्षापासून बंद पडलेली “भैय्याजी सुपरहिट’ची गाडी आता पुन्हा सुरू झाली आहे. सनी देओलच्या या सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर झाली आहे. सनीच्या वाढदिवशी म्हणजे 19 ऑक्‍टोबरला हा सिनेमा रिलीज होण्याची शक्‍यता होती. मात्र आता ही तारीख आठवड्याभराने पुढे ढकलण्यात आली आहे. आता “भैय्याजी सुपरहिट’ 25 ऑक्‍टोबरला रिलीज होणार आहे. नीरज पाठक दिग्दर्शक असलेल्या या सिनेमाचे काम 2011 साली सुरू झाले होते. वेगवेगळ्या कारणांमुळे याच्या शुटिंगमध्ये वारंवार अडथळे येत राहिले. त्यामुळे शुटिंग सलग शेड्युलमध्ये झालेच नाही.

दरवेळी सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर होत गेली. त्यामुळे या सिनेमातून प्रेक्षकांचा इन्टरेस्टही कमी होत गेला आहे. सनीच्या सिनेमांमध्ये सध्या प्रेक्षकांनाही विशेष रस राहिलेला नाही. अशातच सिनेमाची निश्‍चित केलेली रिलीज डेट नव्याने पुढे ढकलावी लागणे हे काही चांगल्या व्यवसायिकतेचे लक्षण नाही. पूर्वी जाहीर केलेल्या 19 ऑक्‍टोबरला “बधाई हो’ आणि “नमस्ते इंग्लंड’ हे दोन सिनेमे रिलीज होत आहेत. त्यामुळेच “भैय्याजी सुपरहिट’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला असावा. यामध्ये सनी देओलबरोबर प्रिती झिंटा, अमिषा पटेल, अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदे हे लीड रोलमध्ये असणार आहेत. 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)