#Betterindia: गाडी शोधण्यासाठी ऍपची मदत घ्या

– सतीश जाधव

वाहन पार्क करणे ही एक समस्याच मानली जाते. कारण गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे वाहन कोठे पार्क करावे, हा एक गंभीर प्रश्‍न चालकाला पडतो. जर गाडी योग्य रितीने पार्क केली नाही तर पोलिसांचा दंड बसतो किंवा अन्य गाडीमालकांची बोलणी खावी लागतात. चालक जर निपुण असेल तर कमी जागेतही चांगल्या रितीने गाडी पार्क करू शकतो. परंतु नवशिखा चालक असेल तर गाडी पार्क करताना जरा गोंधळ उडतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोकळे मैदान किंवा जागा असेल तर आपण हवी तशी गाडी लावू शकतो. परंतु मॉल, सिनेमा थिएटर, पार्किंग एरियामध्ये गाडी लावताना ठराविक जागेतच गाडी लावण्याचे कौशल्य बाळगावे लागते, तेही अन्य गाडीला धक्का न लावता. एवढे करुनही आपण गाडी कोठे पार्क केली हे मात्र लक्षात राहत नाही. मोठ्या मॉलमध्ये असंख्य गाड्या असतात, तेथे आपली गाडी शोधणे ही बाब जरा दिव्यच असते. तसेच रेसिंग कार किंवा क्रिकेट सामन्याच्या ठिकाणी पार्किंग बऱ्याच दूर अंतरावर असते. त्याठिकाणी पार्किंग केल्यानंतर कालांतराने आपण गाडी कोणत्या ठिकाणी पार्क केली, हेच लक्षात राहत नाही. अशा वेळी गुगल नाऊ आपल्याला मदत करते.

आपली गाडी कोणत्या ठिकाणी लावली आहे, याचे मार्गदर्शन करते. पार्किंगचा संपूर्ण डेटा गुगल नाऊमध्ये असतो आणि आपली मोटार कोठे आहे, हे अचूकपणे सांगतो. यापूर्वी आपण गाड्या कोणत्या ठिकाणी पार्क केल्या होत्या, याचीही तो माहिती ठेवतो. परंतु ही माहिती उघड होणार नाही, याची दक्षता घेतो. केवळ कारचालक किंवा मोबाईल यूजरलाच गाडीची माहिती मिळू शकते. ऍटोमॅटिक पार्किंग डिटेक्‍शनमुळे गाडी शोधणे सहज शक्‍य झाले आहे. चालकाने बस जरी आणली असेल तरीही ऍप संबंधिताला अचूक माहिती देतो. हा ऍप अपडेट केला तर आवाजाच्या माध्यमातूनही गाडीकडे जाण्याची दिशा सांगितली जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)