इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी बनली बेस्टची पहिली महिला बस ड्रायव्हर 

मुंबई – ट्रक आणि बससारख्या वाहनांना विशेषतः पुरुष चालवताना दिसतात. परंतु, २१ व्या शतकातील महिला पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. मुंबईतील एक मुलगी बेस्ट बसला चालवणारी पहिली महिला चालक बनली आहे. या मुलीचे नाव प्रतिक्षा दास आहे. केवळ २४ वर्षीय प्रतिक्षा दासने मालाडच्या ठाकूर कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केली आहे. आणि ती मुंबई शहरातील एकमेव महिला बेस्ट ड्रायव्हर बनली आहे.

याबद्दल बोलताना प्रतिक्षा दास म्हणाली कि, हि एक अशी गोष्ट ज्यामध्ये मी मागील सहा वर्षांपासून मास्टर बनण्याच्या प्रयत्नात होते. अवजड वाहनांसाठी माझे प्रेम नवीन नसून याआधीही मी टू-व्हीलर, कार आणि आता बस व ट्रक चालवत आहे. अवजड वाहने चालविणे आवडत असल्याचेही तिने सांगितले.

प्रतिक्षा पुढे म्हणाली कि, इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला आरटीओ ऑफिसर बनण्याची इच्छा होती. यासाठी मला अवजड वाहनांच्या लायन्सनची गरज होती. कारण ते अनिवार्य आहे. यासाठी मला बस चालविणे शिकायचे होते, असे तिने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)