शाहिद कपूरकडून कंगणा रणावतला शुभेच्छा

“कबीर सिंह’ या आपल्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून “ए/यु’ सर्टिफिकेट मिळेल, अशी आशा शाहिद कपूरला वाटते आहे. तेलगू सिनेमा “अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेल्या या सिनेमात शाहिदबरोबर कियारा आडवाणी असणार आहे. या सिनेमामध्ये सातत्याने शिव्या, शिवराळ भाषा आणि अल्कहोल, ड्रग्जच्या व्यसनासारख्या गोष्टींचा भडिमार दाखवण्यात आला आहे. मात्र शाहिदला त्याचे टेन्शन नव्हते. त्याचा “कबीर बेदी’ पूर्वी कंगणा रणावतच्या “मेन्टल है क्‍या’बरोबर 21 जूनला रिलीज होणार होता. मात्र नंतर “मेन्टल…’ची निर्माती एकता कपूरने तिचा सिनेमा 26 जुलैला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 21 जूनला एकटा “कबीर सिंह’रिलीज होणार आहे.

याच मुद्दयावरून शाहिदने कंगणाला शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही वर्षभरापूर्वीच रिलीज डेट निश्‍चितकेली होती. त्याच दिवशी सिनेमा रिलीज करायचा हे गणित निश्‍चित होते. आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झालो आहोत. आता आमच्या नियोजित तारखेला आमचा एकटाच सिनेमा रिलीज होतो आहे. कंगणा आणि राजकुमार राव लीड रोलमध्ये असलेल्या तिच्या सिनेमाची रिलीज डेट बदलावी लागली, त्याबद्दल तिला शुभेच्छा असे शाहिदने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)