जगातील बलाढ्य नेत्यांकडून शुभेच्छा

देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट होताच जगातल्या विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा संदेश येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी शुभेच्छा दिल्या. शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे अभिनंदन. तुमच्यासोबत काम करु असे विक्रमसिंघे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

मोदींचे जवळचे मित्र समजले जाणारे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सुद्धा मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-इस्त्रायल मैत्रीसंबंध अधिक भक्कम करण्यासाठी काम करु असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी फोनवरुन मोदींशी चर्चा करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुद्धा टेलिग्राम संदेशाद्वारे मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अबुधाबीचे राजकुमार शेख मोहम्मद बिन झयद अल नहयान,

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, व्हिएतनामचे पंतप्रधान गुयेन झियान फुक यांनीही मोदींचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)