बेस्टच्या संपाने मुंबईकरांचे हाल

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने मुंबईकरांचे हाल सुरू झाले आहेत. त्यांचा हा संप वेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी असून तो बेमुदत आहे. शिवसेना प्रणित कामगार संघटनेने संपातून माघार घेतल्यानंतरही मुंबईत आज बेस्टच्या केवळ पाच बसेसच धाऊ शकल्या आहेत. या संपात बेस्टचे सुमारे 32 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अत्यावश्‍यक सेवा कायद्याचे हत्यार उपसले असून संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन चर्चेसाठी यावे असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने मुंबईकरांचे हाल लक्षात घेऊन संपातून माघार घेतली असून आमच्या संघटनेचे 11 हजार कर्मचारी कामावर बुधवारी हजर झाले आहेत असे या संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे. बेस्ट मध्ये बेस्ट वर्कर्स युनियन ही सर्वात मोठी संघटना आहे. शिवसेनेच्या संघटनेने संप मागे घेऊन आपला खरा रंग दाखवला आहे अशी टीका या संघटनेचे नेते शशांक राव यांनी केली आहे. बेस्टच्या ताफ्यात 3200 बसेस असून या संस्थेतर्फे शेजारच्या ठाणे आणि नवी मुंबई येथेही सेवा दिली जाते. या बससेवेतून रोज सुमारे 25 लाख प्रवाशांना सेवा दिली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

औद्योगिक न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. पण तरीही संपाचा कर्मचाऱ्यांचा निर्धार कायम आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी आणि अन्य चाकरमान्यांचे संपामुळे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. याचा ताण लोकल सेवेवरही पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)