#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’ 

बिर्याणी हा असा पदार्थ आहे त्यांच्या वासानेच आपण प्रेमात पडतो. बिर्याणी हा एक शाहीपदार्थ आहे. व्हेजपेक्षा नॉनव्हेज बिर्याणीची टेस्ट काही वेगळीच असते. मुघलांकडून भारतात आलेला हा शाही खाद्यपदार्थ म्हणजे पाक कौशल्याचे एक मोठे प्रमाणपत्र आहे.

बिर्याणीसाठीचे खास हक्‍काचे ठिकाण म्हणजे पुण्याच्या महात्मा फुले मंडईजवळील तुळजाई खानावळ. या खानावळीत शिरताच आपल्या बिर्याणीचा वास येतो. तिचा सुगंध नाकात शिरतो. बिर्याणीतली ही मास्टरी तुळजाईचे बापू नाईक यांनी मिळविली आहे.

मंद विस्तवावर दम पद्धतीने तयार केलेली शुद्ध साजूक तुपातील कमी तिखट अशी उत्कृष्ट दम बिर्याणी खाण्याची मजा काही औरच आहे. त्यातून ती तर तुळजाईमधील असेल तर मग काय विचारूच नका. कोहिनूर बासमती तांदळात तसेच साजूक तुपात ही बिर्याणी केली जाते. विशेष म्हणजे पार्सलसुद्धा सुविधा आहे.

घरगुती कार्यक्रमासाठीसुद्धा किलोच्या दराने बिर्याणी मिळते. या खानावळीत खास फॅमिलीसाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था आहे. बिर्याणी बरोबरच मटण-भाकरी, चिकन, मासेसुद्धा येथे राईस फ्लेट स्वरूपात मिळतात. शाकाहारी बेत असेल तर भाज्याही ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील. त्यामुळे कोणताही समारंभ, कार्यक्रम असेल तर बिनधास्त बेत आखायचा आणि तुळजाईमध्ये ऑर्डर द्यायची.. बस्स…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)