बेंगलूरू बुल्सने तामिल थलायवाजला ‘नमवले’

प्रो कबड्डी मध्ये आज चौथ्या दिवशी बेंगलूरू बुल्स विरूद्ध तामिल थलायवाज सामना झाला. या सामन्यात बुल्सने तामील संघाचा 48-37 असा पराभव केला. या सामन्यात बुल्सच्या पवनकुमार सेहरावत याने वादळी रेडिंग करत 20 गुण मिळवले. तर अजय ठाकुरने देखील 20गुण मिळवले.

पहिल्या सत्राची सुरुवात देखील अनपेक्षित झाली. थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूर याला बुल्सने बाद केले. त्यानंतर सलग सहा रेडमध्ये पवन कुमारने गुण मिळवत संघाला 11-8 अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, सत्राचा टर्निंग पॉईंट ठरला तो पवनची 5 गुणांची रेड ज्यामुळे संघाल ऑल आऊट होण्यापासून तर त्याने वाचवलेच त्याचबरोबर त्याने आपले सुपर टेन देखील पूर्ण केले. त्यानंतर  पहिल्या सत्राच्या  शेवटच्या रेडमध्ये अणखी एक सुपर रेड करत त्याने सामना 28-12 अश्या स्थितीत आणला.
दुसऱ्या सत्रात बुल्सने संयमी खेळ करण्यावर भर दिला तर थलायवाज पुनरागमनाचा प्रयन्त करत होते.  दुसऱ्या सत्रात 7 मिनिटे झाली तेव्हा सामना 39-20 अश्या धावफलकावर होता त्यामुळे बुल्सला केवळ विजयाची औपचारिक पूर्ण करायची होती. त्यात काशीलिंग अडकेने 9 गुण मिळवत रेडिंग मध्ये 500 गुणांचा टप्पा पार केला आणि  बुल्सने सामना 48-37 असा आपल्या नावे केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)