एयरो इंडिया 2019 : आगीत शंभराहून अधिक वाहने जळून खाक

बेंगलूरू – आशियातील सर्वात मोठ्या मिलिट्री एविएशन शो एयरो इंडिया 2019 मध्ये शनिवारी कार्यक्रमस्थळाच्या जवळ कार पार्किंगमध्ये आग लागल्यामुळे थोड्यावेळासठी हा शो थाबंविण्यात आला. या घटनेत शंभराहून अधिक वाहने जळून खाक झाली आहेत.

आगीची माहिती मिळताच लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले. पार्किंगमध्ये असलेल्या सुक्या गवतामुळे आगेचा भडका झाला होता. ही आग पाहून ‘एअर शो’च्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला होता. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जिवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. ही घटना या शोमधील दूसरी मोठी दूर्घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिली घटना म्हणजे या शोच्या सरावादरम्यान मंगळवारी (19 फेब्रुवारी) विमान कोसळल्याने कमाडंर साहिल गांधी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत वायूसेनेचे दोन विमान एकमेकांना धडकले होते.

एयरो इंडिया 2019 शो ला सुरूवात 20 फेब्रुवारीला झाली आहे. हा शो 24 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या शोमध्ये राफेल लढाऊ विमानाचे उड्डाणाची प्रात्यक्षिके दाखविणयात आली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)