मुस्लिम विद्यार्थ्याने जिंकली ‘गीते’वर अाधारित प्रश्नोत्तर स्पर्धा 

नवी दिल्ली – बेगळरूंमधील इस्काॅन व्दारे आयोजित केलेल्या भगवत गीतेवर आधारित प्रश्नोत्तर स्पर्धेत एका मुस्लिम विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. इयत्ता नववीच्या वर्गांत शिकणाऱ्या शेख मोहिउद्दीन याने हा पुरस्कार मिळविला आहे. शेख मोहिउद्दीन हा बेंगळरूमधील सुभाष मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.

शेख मोहिउद्दीन यांच्या शिक्षिकेने सांगितले की, ‘मोहिउद्दीन याने अनेक आंतरशालेय स्पर्धेत भाग घेत यश मिळविले आहे. मात्र, ही स्पर्धा जिंकणे त्याच्यासाठी खास आहे’.

-Ads-

शेख मोहिउद्दीन याने सांगितले की, ‘स्पर्धेदरम्यान मला भगवान कृष्ण यांच्या जीवनावर आणि त्यांनी दिलेल्या उपदेशावर प्रश्न विचारण्यात आले. मला सर्व प्रश्नांची उत्तरे येत होती’. सर्व धार्मिक ग्रंथ आई-वडील आणि गुरूंची (शिक्षकांची) आदर करायला शिकवतात. त्यामुळे जीवन सफल होते. मला आनंद होत आहे की, ‘मी माझ्या आई-वडिलाचे नाव रोशन केले’.

पुढे बोलताना तो म्हणाला की, ‘त्याच्या या यशामागे शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांचा हात आहे’. तो म्हणाला की, ‘मला धर्मांच्या नावावरून वाद-विवाद करणारे लोक आवडत नाही. गीता, बायबल किवां मग कुरान असो सर्व धार्मिक ग्रंथ एकच शिकवण देतात. आपण धर्म, जात यामध्ये भेदभाव नाही केला पाहिजे. आपण सर्व एक आहोत’.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)