#ProKabaddi2019 : बंगळुरू बुल्सपुढे गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सचे आव्हान

बंगळुरू बुल्स वि. गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌स
रात्री 7-30 वाजता

हैदराबाद – खोलवर चढाया व भक्कम पकडी करण्याबाबत ख्यातनाम असलेला बंगळुरू बुल्स संघाविरूद्ध गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स संघ पराभवाची परतफेड करणार काय हीच उत्कंठा या दोन संघांमधील लढतीबाबत निर्माण झाली आहे. प्रो कबड्डी स्पर्धेत आज या संघांमधील लढतीनंतर तेलुगु टायटन्स व तमीळ थलाईवाज यांच्यात सामना होणार आहे.

बंगळुरू संघाने गतवर्षी अंतिम फेरीत गुजरातवर 38-33 असा निसटता विजय मिळविला होता. त्यांची मुख्य मदार रोहितकुमार, पवनकुमार, संजय श्रेष्ठ यांच्यावर आहे. पकडीमध्ये राजूलाल चौधरी, अमित शेरॉन व मोहित शेरावत यांच्यावर त्यांची भिस्त आहे.

गुजरात संघाकडून मोहम्मद शाजिद हुसेन, अबोलफाजी मेघसोदीमहाली या परदेशी खेळाडूंबरोबरच रोहित गुलिया, सोनू गेहलावत यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)