लांबणारा गळीत हंगाम शेतकऱ्यांना फायद्याचाच

File Photo

तोडणी ठप्प : थंडीमुळे उसाला मिळतेय पोषक वातावरण

पुणे  – साखर कारखानदारांनी सध्या तरी गळीत हंगाम बंद ठेवून राज्य शासनाला जागे करण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. हे वातावरण उसाला पोषक असते, त्यामुळे आणखी दहा ते पंधरा दिवसाने जरी उस तोडला, तरी शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

20 ऑक्‍टोबरपासून राज्यात गळीत हंगाम सुरू झाला असला, तरी कारखान्यांनी फारसा उत्साह दाखविलेले नाही. साखर आयुक्तालयातसुद्धा सुमारे 196 कारखान्यांनी गळीत हंगामाच्या परवान्यासाठी अर्ज केले असले, तरी आतापर्यंत फक्त 51 कारखान्यांना रीतसर परवानगी मिळाली आहे. त्यातून ही फक्त 18 कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. राज्यातील एकूण ऊस क्षेत्र पाहता हे प्रमाण अत्यंत गौण आहे.

त्यातच शेतकरी संघटनासुद्धा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ऊस दराची मागणी करत हंगाम सुरू केला जाणार नाही, अशी भूमिका केली. संघटना शेतकऱ्यांना ऊस तोडण्यापासून रोखत असल्याने तोडणी बंद पडली आहे. कारखान्याकडे येणाऱ्या उसाचे प्रमाणही कमी झाले. काही ठिकाणी तर संघटनानी उसाच्या ट्रॉली अडविल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा ऊस वाहतूक बंद केली आहे.यामुळे कारखान्यांनी उस तोडणी स्वत:हून थांबविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हंगाम लाबणार असला, तरी दुसरीकडे मात्र सध्या गेल्या आठवड्यापासून उकाडा कमी होऊन थंडी वाढत आहे.

रात्री थंडी व दिवसा ऊबदार असे वातावरण उसाची “रिकव्हरी’ वाढण्यासाठी महत्त्वाचे ठरत असते. यामुळे वजनातही वाढ होत असल्याने सध्या तोडणी बंद असली तरी तातडीने उसाचे नुकसान होईल ही भीती कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

मजूर अजूनही आले नाहीत

सध्या दिवाळी तोंडावर असल्याने ऊस तोडग्याबाबतच्या चर्चेसाठी कोणीच पुढे आले नाही. तोडणी बंद असल्याने वाहनांचे नुकसान करण्याचाही प्रश्‍न उरला नाही. यामुळे कारखान्यांनीही दिवाळीनंतरच हंगाम सुरू करण्याबाबतची मानसिकता केली आहे. ऊस तोडणी बंद असल्याने जे मजूर लांबून येणार होते, ते अजून आलेले नाहीत. त्यांना अनेक कारखान्यांनी दिवाळीनंतरच येण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)