बेल बॉटम म्हणजे अमिताभ बच्चन पॅंट 

सलमानने त्याचा मेव्हणा आयुष शर्माला लॉंच करण्यासाठी लव्ह यात्री काढला. या चित्रपटाद्वारे त्याच्यासोबतच आणखी एक नवा चेहरा बॉलिवुडला मिळाला. तो म्हणजे वरिना हुसेन. ती स्वत:ला काबुलची अर्थात अफगाणिस्तानची म्हणवून घेते. तेथल्या पूर्वीच्या आयुष्यातील स्मृती तिच्या मनात अजुनही ताज्या आहेत. तेथील तिच्या आजीने सांगितलेल्या कथा व अफगाणि जनतेला हिंदी चित्रपटसृष्टी विषयी असलेले प्रेम आणि आकर्षण याचीही माहिती वरिना देते. वरिना म्हणते की सगळ्या अफगाणांना हिंदी चांगले कळते.

अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या कारकीर्दीत त्यांची बेल बॉटम पॅंट चांगलीच हिट झाली होती. ही पॅंट घालणारे आजही तेथे सापडतात व विशेष म्हणजे या पॅंटला अमिताभ बच्चन पॅंट म्हणूनच आजही तेथे ओळखले जाते. आपल्या आजीने सांगितलेले किस्सेही ती शेअर करते. मला सुरूवातीच्या टप्प्यात दहशतवाद्यांच्या देशातून आलेली मुलगी म्हटले जायचे. मात्र आता चित्र बदलले आहे. असे वरिना सांगते. आता मुली शाळा, कॉलेजात जातात. सरकारमध्ये एक महिला मंत्रीही आहे, असे ती म्हणते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)