#हाॅकी_विश्वचषक_स्पर्धा_2018 : बेल्जियमचा कॅनडावर 2-1 ने विजय

भुवनेश्वर – बेल्जियम हाॅकी संघाने हाॅकी विश्वचषक स्पर्धेतील आपली सुरूवात दमदार केली आहे. बुधवारी कलिंगा स्टेडियमवरील मैदानावर झालेल्या ग्रुप सी मधील पहिल्या सामन्यात बेल्जियमने कॅनडाचा 2-1 ने पराभव केला आहे.

कालच्या सामन्यात बेल्जियमकडून फेलिक्स डेनायर आणि कर्णधार थाॅमस ब्रियल्स यांनी प्रत्येकी एक गोल केले. तर कॅनाडा संघाकडून मार्क पियर्सनने एकमेव गोल केला. जागतिक क्रमवारी पाहता बेल्जियमचा संघ हा तिसऱ्या स्थानी तर कॅनडाचा संघ हा अकराव्या स्थानी आहे.

विश्वचषकात आता बेल्जियम संघाची पुढची लढत ही 2 डिसेंबर रोजी भारतीय संघाशी होईल तर कॅनडाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)