बेलापूरात शहीद जवानांना मानवंदना

बेलापूर – पाडव्याच्या मुहूर्तावर बेलापूरच्या मुख्य चौकात हजारो पणत्या लावून शहीद जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात भारत मातेची प्रतिमा ठेवण्यात आली होती. झेंडा चौकाभोवती ठेवलेल्या हजारो पणत्या व मध्यभागी असलेली भारत मातेची प्रतिमा हे दृश्‍य अतिशय विलोभनीय दिसत होते.

प्रथम सुरज मोरे, देविदास देसाई, अर्जुन पोकळे, बाळासाहेब गुंजाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शत्रुशी लढताना विरमरण आलेले शहीद जवान, पोलीस खात्यात सेवा केलेले शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी हजारो पणत्या पेटविण्यात आल्या.

-Ads-

अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी सैनिक शरद देशपांडे, सुभाष नगरकर, सुरज मोरे, देविदास देसाई, अतुल गोरे, मुकुंद कुटे, जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, रणजीत श्रीगोड, बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, भिमराज हुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रफुल्ल काळे, गोपाल जोशी, अभिषेक खंडागळे, राजेश सुर्यवंशी, शशिकांत तेलोरे, विष्णूकांत लखोटीया, प्रशांत मुंडलीक, सुभाष शेलार, मयुर साळूंके, विजय कोठारी, संदीप जाधव, वेणूगोपाल सोमाणी, महंत काळे, साईनाथ शिरसाठ, निशिकांत लखोटीया, श्रीनिवास हिरवे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)