‘मागास’ समाजातील असल्याने नामदारांच्या शिव्या सहन कराव्या लागतात – पंतप्रधान मोदी

बरेली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशातील बरेली येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा आपण मागास समाजातील असल्याने आपल्याला विरोधकांकडून हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मला काही लोक नीच म्हणून संबोधतात तर काही लोक शिव्या घालतात. असंही आपल्यासारख्या गरिबांना अनेक पिढ्यांपासून नामदारांच्या शिव्या खाण्याची सवय झाली आहे. मात्र मी नामदारांना विचारू इच्छितो की त्यांनी स्वतःच्या परिवाराचे मागासलेपण दूर करण्याव्यतिरिक्त दुसरे कोणते काम केले का?”

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका करताना, ‘विरोधकांना पराभव समोर दिसला की ते माझ्या जातीवरून बोलायला सुरुवात करतात’ असं वक्तव्य देखील केलं.

https://twitter.com/ANINewsUP/status/1119590837711769601

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)