बहुतांश मागण्यांवर एकमत झाल्याने कर्णबधिर मुलांचे आंदोलन मागे

पुणे : मूकबधिर आंदोलकांच्या मागण्यांवर सहमती झाल्याने अखेर पुण्यात सुरु असलेलं मूकबधिरांचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. राज्य सरकारने सभागृहात काही मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिलं आहे. तसेच उर्वरित मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर पूर्ण करणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. शासनाच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला.

गेल्या दोन दिवसांपासून मूकबधिर आंदोलक पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते. आंदोलक तरुणांवर लाठीचार्ज करुन पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. रात्रीपर्यंत आंदोलक उपाशी पोटी बसून होते. या प्रकाराचा सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधिमंडळात कर्णबधिरांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केलं. त्यानंतर दिलीप कांबळे यांनी आंदोलकांना त्या मागण्या मान्य झाल्याचं निवेदन वाचून दाखवलं. संघर्ष संपला नाही, पण ही चांगली सुरुवात आहे असं सांगून हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

दरम्यान, लाठीचार्ज प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबतचे आदेशही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी सामाजिक न्याय व विशेष सहाय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लक्ष घालावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2250085375205021/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)