राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा ‘रायगडावरून’

मुंबई : २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्तारूढ भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांकडून सत्ताधारी पक्षाचे ‘अपयश’ जनतेपुढे मांडण्यासाठी उद्यापासून राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्यापासून कोकणामध्ये परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून पक्षातर्फे रायगड, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई जिल्ह्यांमध्ये १४ जानेवारीपर्यंत सभा घेतल्या जातील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेची सुरुवात उद्या (गुरुवारी) रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली जाणार असून यानंतर महाड आणि गुहागर येथे सभा होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबरच माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासारखे बडे नेते या सभांमध्ये भाग घेणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)